सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे BCCI ने क्रिकेट सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर उर्वरित दोन सामने BCCI ने खबरदारीचा उपाय म्हणून रद्द केले. धरमशाला वन-डे सामन्याकरता सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक हे माजी खेळाडू समालोचनासाठी हजर होते, मात्र यामध्ये संजय मांजरेकर कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे BCCI ने माजी मुंबईकर क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना आपल्या समालोचकांच्या यादीतून वगळल्याचे स्पष्ट झाले.

CoronaVirus : BCCI चे अध्यक्ष फावल्या वेळात काय करत आहेत बघा…

निवृत्तीनंतर मांजरेकर सातत्याने समालोचन करत आले आहेत. मात्र BCCI मधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल स्पर्धेतही मांजरेकर यांना वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संजय मांजरेकर यांनीदेखील हा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते.

पण आता संजय मांजरेकर यांच्या मदतीला माजी मुंबईकर खेळाडू चंद्रकांत पंडीत धावून आले आहेत.

IPL नंतर डीव्हिलियर्स पुन्हा आफ्रिकेकडून खेळणार?

“मी संजय मांजरेकर यांना अगदी लहानपणापासून ओळखतो. एखाद्याला इजा करेल असा तो माणूस नाही. तो त्याची जी काही मतं असतील, ती स्पष्टपणे मांडतो आणि मला त्याची हिच गोष्ट आवडते. तुमच्या तोंडावर खरं बोलणारा माणूस कोणालाच आवडत नाही. समालोचकाच्या भूमिकेत असताना काही वेळा मांजरेकर असे काही बोलून गेले, जे काहींना आवडलं नसावं. पण संजय मांजरेकर केवळ नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कोणाची स्तुती करणारी व्यक्ती नाही”, असे सांगत सांगत पंडित यांनी मांजरेकरांची पाठराखण केली.