27 September 2020

News Flash

US Open 2020 : नाओमी ओसाका विजेती, अझरेंकाचं स्वप्न भंगलं

१-६, ६-३, ६-३ ने केली मात

फोटो सौजन्य - Reuters

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं व्हिक्टोरिया अझरेंकाचं स्वप्न भंगलं आहे. जपानच्या नाओमी ओसाकाने अंतिम सामन्यात व्हिक्टोरियावर १-६, ६-३, ६-३ अशी मात केली. ओसाकाचं हे तिसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं. या तीन पैकी दोन विजेतेपद तिने अमेरिकन ओपन स्पर्धेत मिळवली आहेत.

उपांत्य फेरीत सेरेना विल्यम्सवर मात करणाऱ्या व्हिक्टोरिया अझरेंकाने धडाकेबाज सुरुवात केली. १-६ अशा अंतराने पहिला सेट खिशात घातल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अझरेंकाकडे ३-० अशी आघाडी होती. मात्र यानंतर ओसाकाने सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. सलग सहा गेम पॉईंट जिंकत ओसाकाने ६-३ च्या फरकाने दुसरा सेट जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही ओसाकाने व्हिक्टोरियाला कडवी झुंज देत ६-३ ने सेट जिंकत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:08 pm

Web Title: naomi osaka wins second us open title with a comeback against victoria azarenka psd 91
Next Stories
1 ग्रँडस्लॅम क्षितिजावर आज नव्या ताऱ्याचा उदय
2 एवढे अनर्थ एका रागाने केले!
3 डाव मांडियेला : मारतीसाठी उतारी
Just Now!
X