भारताचा अव्वल फॉम्र्युला-वन शर्यतपटू नरेन कार्तिकेयनने ‘सुपर फॉम्र्युला’ शर्यतीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. इम्पुल होशिनो रेसिंग संघासाठी खेळणाऱ्या ३७ वर्षीय नरेनने पात्रता फेरीत दुसरे स्थान प्राप्त केले. टॉम टोयोटा संघाच्या आंद्रे लॉटररने अव्वल स्थान पटकावले.
याआधी ‘फॉम्र्युला निपॉन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि आता ‘सुपर फॉम्र्युला’ असे नामकरण झालेल्या शर्यतीत दलारा एसएफ १४ चेसिस यंत्राचा वापर करण्यात येतो. २ लिटर क्षमता असलेल्या आणि ५५० बीएचपी इंजिनची क्षमता असलेल्या यंत्रणेचा शर्यतीदरम्यान उपयोग होतो.
फॉम्र्युला-वन र्शयतीप्रमाणे ‘सुपर फॉम्र्युला’ शर्यतीतसुद्धा क्यू१, क्यू २, क्यू ३ अशा सराव शर्यती असतात. यातील विजेत्यानुसार ४३ फेऱ्यांच्या आणि २५० किलोमीटरच्या मुख्य शर्यतीसाठी पोल पोझिशन निश्चित होते.
नरेनने सातत्यपूर्ण प्रदर्शन करताना अव्वल पाचमधील स्थान कायम राखले. काही प्रसंगी अव्वल स्थान कब्जा करणाऱ्या लॉटररला त्याने कडवी टक्कर दिली.
‘‘हंगामातील पहिल्याच शर्यतीसाठी पात्र ठरल्याचा आनंद आहे. अव्वल स्थान मिळवण्यासाठीची चुरस पाहता पात्र ठरणे समाधानकारक आहे. टप्प्याटप्प्याने कामगिरीत सुधारणा केली. मुख्य शर्यतीपूर्वी कसून मेहनत घेण्याचे ठरवले आहे,’’ असे नरेनने सांगितले.२०१४चे सुपर फॉम्र्युला वेळापत्रक
तारखा        स्थळ        देश
१३ एप्रिल        सुझुका सर्किट    जपान
१८ मे        फुजी स्पीडवे    जपान
अनिश्चित        अनिश्चित        कोरिया    
१३ जुलै        फुजी स्पीडवे    जपान
२४ ऑगस्ट    ट्विन रिंग मोटेगी    जपान
१४ सप्टेंबर        ऑटोपोलिस    जपान
२८ सप्टेंबर        स्पोर्ट्सलँड सुगो    जपान
९ नोव्हेंबर        सुझका सर्किट    जपान

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार