24 February 2021

News Flash

अर्जुन तेंडुलकरला मुंबईने विकत घेणं ही घराणेशाही नाही का?; IPL लिलावानंतर अनेकांना आठवला प्रणव धनावडे

घराणेशाहीसंदर्भात सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आणि मतमतांतरे पहायला मिळतायत

(फोटो : ट्विटरवरुन साभार)

इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ व्या पर्वातील खेळाडूंचा लिलाव गुरुवारी चेन्नईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये अनेक खेळाडूंना अनपेक्षितपणे अधिक किंमतीला विकत घेण्यात आलं तर काही चांगल्या खेळाडूंना म्हणावी तशी बोली संघ मालकांनी लावली आहे. याच लिलावामध्ये एक खास नाव सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे अर्जुन तेंडुलकर. लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. २० लाखांच्या बेस प्राइजला अर्जुनला मुंबईने आपल्या संघात घेतलं आहे. मात्र अर्जुनला मुंबई इंडियन्सने विकत घेतल्यानंतर इंटरनेटवर पुन्हा एकदा घराणेशाहीची चर्चा सुरु झाली आहे.

नक्की वाचा >> IPL Auction: सचिन बेबी आणि अर्जुन तेंडुलकर सेमच माणसाचं नाव आहे की…?; RCB मुळे नेटकरी गोंधळले

मुंबई इंडियन्सनेही विशेष व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत अर्जुनचं संघामध्ये स्वागत केलं आहे. त्याच्या रक्तातच क्रिकेट आहे असं मुंबई इंडियन्सने म्हटलं आहे.

Cricket in his blood. Refined in the nets. Now ready to take the 22-yards by storm

Welcome home, Arjun Tendulkar!#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/jncjVF64Lh

— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021

मात्र अर्जुनला अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या संघानेच विकत घेतल्याने अनेकांनी या निर्णयावरुन घराणेशाहीच्या मुद्द्याला हात घातला आहे. अर्जुनला मुंबईने विकत घेणं म्हणजे नेपोटिझम नाही का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भात जोरदार चर्चा असून यावरुन गंभीर टीकेबरोबरच मिम्सची व्हायरल होत आहेत. अनेकांना तर एकाच सामन्यात हजार धावा करणाऱ्या प्रणव धनावडेचेही आठवण झाल्याचे सोशल नेटवर्किंगवर पहायला मिळत आहे.

नक्की वाचा >> IPL Auction : अर्जुनला CSK ने विकत घेतलं तर…; लिलावाआधीच Arjun Tendulkar होता टॉप ट्रेण्डमध्ये

१) हा पाहा अर्जुनचा रेकॉर्ड

२) कंगना कधी बोलणार

३) त्याच्या नावावरुन त्याला टार्गेट करणं चुकीचं

४) पाठिंबा

५) ही घराणेशाहीच

६) हा आमचा माल आहे

७) काय विरोधाभास आहे

८) माझा मुलगा

९) काही जणांचा तर्क

१०) त्याला खेळू तर द्या

११) कोणाचं काय तर कोणाचं काय

१२) क्रिकेट काय बॉलिवूड नाहीय…

१३) हा भारत आहे

१४) कटू सत्य

१५) घराणेशाहीचा खरा चेहरा

१६) अशी टीका तेच करतील ज्यांना…

१७) यावर कधी बोलणार?

१८)या दोंघावर कधी बोलणार कंगना?

दरम्यान, मुंबई इंडियन्सने विकत घेतल्यानंतर अर्जुनने आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली असून यासंदर्भातील व्हिडीओ मुंबई इंडियन्सनेच शेअर केला आहे. “मी लहानपणापासून मुंबई इंडियन्स संघाचा खूप मोठा चाहता आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, सपोर्टीग स्टाफ आणि संघ मालकांचा आभारी आहे. मुंबई पलटनमध्ये सहभागी होण्यास मी खूप उत्सुक असून ब्लू आणि गोल्ड जर्सी घालण्याची आतुरतेने वाट बघतोय,” असं अर्जुन म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 1:08 pm

Web Title: nepotism and arjun tendulkar in trend after mi buys him in ipl auctions 2021 scsg 91
टॅग IPL 2021
Next Stories
1 IND vs ENG : तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत?
2 IND vs ENG : मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराहला विश्रांती; सूर्यकुमारला संधी
3 IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?
Just Now!
X