न्यूझीलंड क्रिेकेट बोर्डाने आगामी भारतीय दौऱयासाठीच्या न्यूझीलंडच्या संघाची मंगळवारी घोषणा केली. न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू जिमी निशमचे पुनरागमन झाले असून, मार्टिन गप्तिल यालाही सलामीवीर म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
जिमी निशम दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. निशमने आपला अखेरचा कसोटी सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो पाठीच्या दुखापतीचा सामना करत होता. वर्षभराच्या उपचारानंतर निशमचे न्यूझीलंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. २५ वर्षीय निशमने न्यूझीलंडकडून आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या न्यूझीलंडच्या संघातील सलामीवीर जीत रावल आणि वेगवान गोलंदाज मॅट हेन्री यांना वगळण्यात आले आहे. मार्टिन गप्तिल सलामवीर म्हणून संघात कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय संघाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा संघ एक सराव सामना देखील खेळणार आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.
न्यूझीलंडचा संघ-
केन विल्यमसन (कर्णधार) , ट्रेंट बोल्ट, डोग ब्रासवेल, मार्क क्रेग, मार्टिन गप्तिल, टॉम लाथाम, जिमी निशम, हेन्री निकोल्स, ल्युक रोन्ची, मिचेल सॅन्थनर, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनेर , बी.जे. वॉल्टिंग
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 1:08 pm