आगामी कसोटी मालिका आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी (WTC) न्यूझीलंडचा क्रिकेट संघ इंग्लंडला पोहोचला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने याविषयी माहिती दिली. “टीम साऊदी, बीजे वॉटलिंग, रॉस टेलर आणि नील वॅग्नर सोमवारी ऑकलंडहून साऊथम्प्टनच्या संघात सामील होतील. मालदीवला असलेले कर्णधार केन विल्यमसन, काइल जेमीसन, मिचेल सेंटनर, टीम फिजिओ टॉमी सिमसेक आणि ट्रेनर ख्रिस डोनाल्डसन सोमवारी (यूके वेळेनुसार) दाखल होतील.”

आयपीएलच्या स्थगितीनंतर विल्यमसन आणि संघाचे उर्वरित सदस्य मालदीवमध्ये गेले. तेथे ते क्वारंटाइन कालावधीत होते. सोमवारी बॅट्समन विल यंग देखील संघात सामील होईल आणि त्यानंतर तो क्वारंटाइन राहिल. मंडळाने म्हटले आहे, “ट्रेंट बोल्ट माउंट माऊंगानुई येथे रविवारी आपल्या कुटुंबीयांना भेटेल. सर्व सदस्यांची दररोज करोना चाचणी होईल.”

 

 

इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी १९ किंवा २४ मे रोजी मुंबईत एकत्र येऊ शकतात. भारतीय संघ २ जूनला चार्टर विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. यापूर्वी संघाला क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.

१९ मे रोजी हे खेळाडू मुंबईत येऊन दोन आठड्यांसाठी क्वारंटाइन राहतील आणि इंग्लंडला निघतील अशी चर्चा होती, मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंना २४ मेचाही पर्याय दिला आहे. “दोन तारखांवर चर्चा झाली असून येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.