27 September 2020

News Flash

ट्रेनिंग विसरा, आराम करा ! विश्वचषकासाठी BCCI चा टीम इंडियाला सल्ला

परिवारासोबत वेळ घालवण्याचाही संदेश

३० मे पासून सुरु होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतीय खेळाडू नुकतेच आयपीएलचा बारावा हंगाम संपवून मोकळे झाले आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण येत होता. यावर उपाय म्हणून बीसीसीआयने विश्वचषकाआधीच्या मालिकांमध्ये महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. आता आगामी विश्वचषकासाठी BCCI ने टीम इंडियाच्या खेळाडूंना एक आगळावेगळा सल्ला दिला आहे. आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंना तात्काळ सरावाला न सुरुवात करता आराम करावा असा संदेश खेळाडूंना देण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकाआधी हिटमॅन सपत्नीक मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर

२२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. मात्र त्याआधी खेळाडूंनी स्वतःला सरावामध्ये न जुंपता आपल्या परिवारासोबत वेळ घालवावा, फिरायला जावं आणि २१ मे रोजी मुंबईत सकारात्मक मन आणि विचाराने परत यावं असा संदेश खेळाडूंना देण्यात आला आहे. यानंतर कर्णधार विराट कोहलीने सुट्टी घेत बाहेर जाणं पसंत केलं आहे. उप-कर्णधार रोहित शर्माही आपली पत्नी आणि मुलीसह मालदीवला गेला आहे. तर फिरकीपटू युजवेंद्र चहल गोव्याला गेला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने ही कल्पना दिली असल्याचं बोललं जातंय.

२०१८ सालात भारतीय संघ एकामागोमाग एक मालिका खेळतो आहे. त्यातचं आयपीएल आणि विश्वचषक यांच्या अवघ्या काही दिवसांचं अंतर आहे. एवढ्या व्यस्त वेळापत्रकाचा खेळाडूंच्या शरिरावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचसोबत मोठ्या कालावधीपर्यंत खेळाडू आपल्या परिवारासोबत राहिलेले नसतात. अशावेळी आपल्या मित्रांसोबत-परिवारासोबत काहीकाळासाठी फिरायला गेल्यास त्यांच्यावरचा भाल हलका होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – आनंदाची बातमी ! केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2019 1:44 pm

Web Title: no training just rest and relax bcci gave unique advice to its players
टॅग Bcci
Next Stories
1 विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं ही मानाची गोष्ट – भुवनेश्वर कुमार
2 आनंदाची बातमी ! केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त
3 Cricket World Cup 2019 : नव्या सुवर्णाध्यायाचे लक्ष्य!
Just Now!
X