सिडनी वन-डे सामन्यात भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी मात केली. 3 सामन्यांच्या मालिकेत सध्या भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 289 धावांचं आव्हान भारतीय संघ पेलवू शकला नाही. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने, आपल्या फलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – हार्दिक-लोकेश राहुलच्या जागी शुभमन गिल-विजय शंकरची संघात निवड

“ज्या पद्धतीने आम्ही फलंदाजी केली ती आमच्या लौकिकाला साजेशी नव्हती. गोलंदाजीमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. सिडनीच्या खेळपट्टीवर 300 च्या पार धावसंख्या होऊ शकली असती, मात्र आम्ही त्यांना 288 वर रोखलं. मात्र पहिल्या काही मिनीटांमध्ये तिघा फलंदाजांचं बाद होणं, इकडेच आम्ही बॅकफूटला ढकलले गेलो.” विराटने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : सिडनी वन-डे सामन्यात नोंदवलेले हे ९ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

यावेळी विराटने रोहित आणि धोनीच्या खेळीचं कौतुक केलं. “रोहितने चांगला खेळ केला, धोनीनेही त्याला चांगली साथ दिली. मात्र धोनी बाद झाल्यानंतर रोहितवर दबाव आल्यामुळे सामन्यात ऑस्ट्रेलिया वरचढ होत गेली. धोनी बाद झाल्यानंतर एखादी चांगली भागीदारी आम्हाला विजय मिळवून देऊन गेली असती. मात्र ऑस्ट्रेलियाने योग्य वेळी फलंदाजांना मोठे फटके खेळायला लावून माघारी धाडलं, ज्याचं श्रेय त्यांना दिलचं पाहिजे.” विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या कामगिरीचंही कौतुक केलं. दुसरा सामना 15 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Video : जेव्हा DRS ची संधी गमावणं भारताला महागात पडतं, धोनीला पंचांनी चुकीच्या पद्धतीने ठरवलं बाद