News Flash

आजच्या दिवशी सेहवागने पाकिस्तानात मिळवला होता मोठा ‘बहुमान’

29 मार्च ही तारीख सेहवागसाठी आहे खास

29 मार्च ही तारीख भारतीय क्रिकेट आणि वीरेंद्र सेहवागसाठी खूप खास आहे. 2004मध्ये आजच्या दिवशी सेहवागने तिहेरी शतक झळकावले. या पराक्रमामुळे सेहवागला मुलतानचा सुलतान बनवण्यात आले. कसोटी क्रिकेटमध्ये 300 धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. या दिवशी सेहवागने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला. सकलैन मुश्ताकने 200 पेक्षा जास्त धावा दिल्या.

 

वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुलतानच्या त्या खेळीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले, ”29 मार्च – माझ्यासाठी खास दिवस आहे. या दिवशी कसोटी क्रिकेटमधील पहिले तिहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा बहुमान मला लाभला. आणि केकवरील आयसिंग म्हणजे ही धावसंख्या पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये झाली होती.” या सामन्यात सेहवागने 309 धावा केल्या.

योगायोगाने, चार वर्षांनंतर, दुसर्‍या दिवशी 28 मार्च रोजी सेहवागने दुसरे तिहेरी शतक झळकावले. सेहवागने चेन्नईमध्ये 28मार्च रोजी तिहेरी शतक पूर्ण केले आणि दुसर्‍या दिवशी 29 मार्च रोजी 319 धावांवर बाद झाला. सर डॉन ब्रॅडमन कसोटी क्रिकेटमध्ये दोन तिहेरी शतके ठोकणारा पहिले फलंदाज होते. त्यांच्यानंतर वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांनी कसोटीत दोन तिहेरी शतके ठोकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 4:59 pm

Web Title: on this day virender sehwag became first indian to score a triple century adn 96
Next Stories
1 रॉजर फेडरर स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
2 पुण्यात विराटचे ‘द्विशतक’, धोनी-अझरुद्दीनच्या यादीत मिळवले स्थान
3 ”बॉल स्विंग करण्यासाठी वकार युनूस चिटिंग करायचा”
Just Now!
X