प्रत्येक देश सध्या करोनाविरोधात आपापल्या परीने झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रम करत आहेत. क्रीडा विश्वालाही करोनाचा दणका बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू सध्या आपापल्या घरीच आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत. काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

‘टीम इंडिया’ला धक्का! क्रिकेट स्पर्धा बंद असूनही गमावलं अव्वल स्थान, कारण…

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण यानेदेखील लाईव्ह चॅटच्यामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. एका क्रीडा संकेतस्थळाला त्याने लाईव्ह चॅटच्या माध्यमातून मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने त्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट आणि IPL च्या आठवणी सांगितल्या. कोणत्याही बड्या खेळाडूशिवाय जर IPL जिंकायचं असेल तर त्यासाठी संघाचे नेतृत्व हे एका विशिष्ट खेळाडूकडे हवे, असे मत त्याने बोलताना मांडले. तसेच त्या खेळाडूचे त्याने नावही सांगितले.

“द्रविडमुळे मुंबईत त्रिशतक हुकलं”; सेहवागने लावला होता आरोप

२००८ साली राजस्थान रॉयल्स संघाने IPL विजेतेपद पटकावले होते. त्या विजेत्या संघात युसूफ पठाण होता. लाईव्ह चॅटमध्ये क्रीकट्रॅकरशी बोलताना युसूफ पठाण म्हणाला, “मी शेन वॉर्न याच्या नेतृत्वाखाली IPL मध्ये तीन वर्षे खेळलो. त्याच्या सोबतच्या खूप आठवणी आहेत. सामना सुरू होण्याआधी, फलंदाजाला कसं बाद करता येईल, याबद्दल तो आम्हा साऱ्यांना मार्गदर्शन करायचा. आम्ही त्याने सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळायचो आणि फलंदाज खरंच तशाप्रकारे बाद देखील व्हायचे.” असे युसूफ पठाण म्हणाला.

लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

“दुर्दैवाने मला वॉर्न च्या नेतृत्वाखाली फार खेळता आलं नाही. मला तीन वर्षच हे भाग्य लाभलं. आमच्या त्या संघात कोणीही स्टार खेळाडू नव्हता. संघात देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा होता आणि अगदी मोजके विदेशी खेळाडू होते, पण त्याने संघाचे नेतृत्व केले, संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आणि विजेतेपदही मिळवून दिले. त्यामुळे कोणत्याही बड्या खेळाडूशिवाय IPL जिंकायचे असेल, तर कर्णधार वॉर्नच हवा” असे युसूफ पठाणने अभिमानाने सांगितले.