06 August 2020

News Flash

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण

आधी तीन खेळाडू होते करोना पॉझिटिव्ह

इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाक क्रिकेट संघाला एक भला मोठा धक्का बसला आहे. परदेश दौऱ्यावर निघण्याआधी पाक क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची चाचणी घेतली होती. त्यात एकूण १० खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ असे तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर मंगळवारी आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहम्मद हाफीज आणि वहाब रियाज या दोन ज्येष्ठ खेळाडूंचाही यात समावेश आहे.

२८ जून रोजी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. त्याआधी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने करोना चाचणी घेतली. त्यातून हे निष्पन्न झाले. सोमवारी करोनाची लागण झालेल्या खेळाडूंना क्वारंटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण आता एकूण १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. आधी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ यांना करोनी लागण झाल्याचे समजले. त्यानंतर फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २९ जणांच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या पाक संघात राखीव खेळाडू म्हणून आहेत. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी स्वतःची करोना चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 7:06 pm

Web Title: pakistan cricket board pcb has confirmed 7 more cricketers tested covid 19 positive total makes 10 including fakhar zaman mohammad hafeez wahab riaz vjb 91
Next Stories
1 प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला करोनाची लागण
2 Video : भारताने आजच्याच दिवशी जिंकली होती चॅम्पियन्स ट्रॉफी
3 महेला जयवर्धनेने केलं रोहित शर्माचं कौतुक, म्हणाला…
Just Now!
X