क्रिकेट या खेळात कायम खेळाडूची गुणवत्ता पाहिली जाते. पण पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूला सापत्न वागणूक दिली गेल्याचा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने केला होता. पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता. तो हिंदू आहे, म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला, असे अख्तरने सांगितले. त्यानंतर दानिश कनेरिया यानेही आपल्याबाबत घडलेल्या गोष्टी सांगून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे दाद मागितली, पण अद्याप त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून काहीही उत्तर मिळालेले नाही, असे त्याने सांगितले आहे.

टोक्यो ऑलिम्पिक २०२० नव्हे, २०२१… अखेर ऑलिम्पिक आयोजन लांबणीवर!

मी हिंदू असल्याने माझ्यावरील अन्यायाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अद्यापही झोपलेले आहे. देवाला माझी दया आली तर बरं होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी यात लक्षात घालावं. सगळ्यांना न्याय मिळतो, मग मला का नाही? PCB ला पाठवलेले पत्र त्यांचे मला आलेले उत्तर मी लवकरच येथे शेअर करेन. मी बोर्डाकडे माझे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. मला क्रिकेट संघात घेत नसाल तर किमान मला प्रशिक्षक म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी असे मी पत्रात लिहिले होते पण त्यावर त्यांचे नकारात्मक उत्तर आले, असे त्याने ट्विट केले आहे.

सलाम! करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार सहा महिन्यांचा पगार

अख्तर काय म्हणाला होता?

“पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता. तो हिंदू आहे, म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघासाठी अनेक विजय मिळवून दिले. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या. पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंना रुचायचे नाही. काहींची तर त्याला मारण्यापर्यंतही मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूने लवकर कारकिर्द संपवली, नाही तर त्याने जास्त काळ संघात राहून पाकिस्तानला विजय मिळवून दिले असते”, असे शोएब अख्तरने सांगितले होते.

Video : …म्हणून त्याला करावं लागलं चक्क कुत्र्यांच्या खेळण्याचं समालोचन

काय म्हणाला होता दानिश कनेरिया?

“शोएब अख्तरने सत्य सांगितलं आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे मी जाहीर करणार. याआधी या विषयावर बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण आता मी बोलणार,” असं दानिशने एएनआयशी बोलताना सांगितलं होते.