News Flash

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : पेरूची अंतिम फेरीत धडक; चिलीवर ३-० अशी मात

पेरूने चिलीची सुवर्णमय परंपरा मोडीत काढली.

पोटरे अलेग्रे : पेरू संघाने गतविजेत्या चिलीचा ३-० असा धुव्वा उडवत तब्बल ४४ वर्षांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. एडिन्सन फ्लोरेस (२१व्या मिनिटाला), योशिमार योटून (३८व्या मिनिटाला) आणि पावलो गुरेरो (९०व्या मिनिटाला) यांनी गोल करत पेरूला विजय मिळवून दिला. आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत पेरूला ब्राझीलच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चिलीने २०१५ आणि २०१६मध्ये अर्जेटिनाला हरवून कोपा अमेरिका करंडकावर नाव कोरले होते. पण पेरूने चिलीची सुवर्णमय परंपरा मोडीत काढली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:02 am

Web Title: peru into final after victory over chile in copa america football 2019 zws 70
Next Stories
1 Wimbledon 2019 : विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : बार्टीची विजयी मुसंडी
2 World Cup 2019 : भारतीय संघाच्या सुरक्षिततेबद्दल आयसीसीकडून तडजोड? व्यवस्थापनाकडून नाराजी
3 World Cup 2019 : पंचांशी हुज्जत घातल्यामुळे विराट कोहली अडचणीत, होऊ शकते बंदीची कारवाई
Just Now!
X