News Flash

पृथ्वी आणि माझा दर्जा वेगळा -गिल

रविवारी गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

शुभमन गिल

पीटीआय, कोलकाता

पृथ्वी शॉ आणि माझ्या फलंदाजीचा दर्जा वेगळा असून आम्हा दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज शुभमन गिलने व्यक्त केली.

रविवारी गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यंदाच्या हंगामात त्याने दोन्ही अर्धशतके सलामीला येऊन झळकावली आहेत. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमाविषयी त्याला विचारले असता गिल म्हणाला, ‘‘ख्रिस लिन व सुनील नरिन आमच्यासाठी सलामीला चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे मला मधल्या फळीतही खेळायला आवडते. संघ व्यवस्थापन सांगले त्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मी तयार असून संघाच्या विजयात योगदान देणे हेच माझे मुख्य लक्ष्य आहे.’’

‘‘पृथ्वी हा एका वेगळ्या दर्जाचा व शैलीचा फलंदाज आहे. तो सुरुवातीपासूनच आक्रमकतेवर भर देतो, तर माझी शैली किंचित वेगळी आहे. मात्र आमच्या दोघांची तुलना करणे चुकीचे ठरेल. आम्ही गेली २-३ वर्षे एकत्र क्रिकेट खेळत आहोत व पृथ्वीसोबत खेळताना मला नेहमीच मजा येते,’’ असे गिलने पृथ्वीसह केल्या जाणाऱ्या तुलनेविषयी विचारले असता सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:00 am

Web Title: prithvi shaw and my state are different gill
टॅग : IPL 2019
Next Stories
1 प्रशासकीय समितीवर लक्ष्मणची आगपाखड
2 पंजाबच्या नावावर IPL मधला लाजिरवाणा विक्रम
3 Video : गेलचा विनोदी चौकार… पण फलंदाजीत नव्हे तर फिल्डिंगमध्ये
Just Now!
X