News Flash

Pro Kabaddi 7 : यू मुम्बाच्या संदीप नरवालची अनोखी कामगिरी

चढाई आणि पकडीत २०० गुण मिळवणारा संदीप दुसरा खेळाडू

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बा संघाची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झालेली नाहीये. ९ सामन्यांनंतर यू मुम्बाचा संघ ४ विजयांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. अनुभवी चढाईपटूंची कमतरता या महत्वाच्या कारणामुळे यू मुम्बाचा संघ यंदा आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकत नाहीये. मात्र संघाचा अष्टपैलू खेळाडू संदीप नरवालने यंदाच्या हंगामात एका अनोख्या पराक्रमाची नोंद केली आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाई आणि पकडीमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा संदीप दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी मनजीत छिल्लरने अशी कामगिरी करुन दाखवली होती.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात यू मुम्बाने पाटणा पायरेट्स संघावर ३४-३० अशा फरकाने मात केली. या सामन्यात ६ गुणांची कमाई करत संदीपने ५०० गुणांचा टप्पा पार केला. संदीपचे आताच्या घडीला प्रो-कबड्डीमध्ये १०९ सामन्यात ५०४ गुण झाले आहेत. यामध्ये त्याच्या चढाईमधील २३४ गुणांचा आणि पकडीतील २७० गुणांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात संदीपने चढाईमध्ये ३ आणि पकडीमध्ये ३ गुण मिळवले. यामध्ये त्याच्या एका सुपर टॅकलचाही समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 8:56 pm

Web Title: pro kabaddi 2019 u mumba all rounder sandeep narwal creates record against patna pirates psd 91
Next Stories
1 IPL – माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू सनराईजर्स हैदराबादच्या सहायक प्रशिक्षकपदी
2 तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू
3 Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या कसोटीतून बाहेर
Just Now!
X