News Flash

Budget 2020 : अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २८२६.९२ कोटींची तरतूद

२०१९-२०च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प मांडताना पुढील आर्थिक वर्षांसाठी क्रीडा क्षेत्रासाठी २८२६.९२ कोटींची तरतूद केली आहे. २०१९-२०च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे.

*  ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमांतर्गत देशातील विविध भागांत युवकांच्या क्रीडा विकासासाठी २९१.४२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

*  राष्ट्रीय क्रीडा संघटनांना देण्यात येणाऱ्या निधीत ५५ कोटी रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गतवर्षी ३००.८५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. ताज्या अर्थसंकल्पात मात्र २४५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

*  क्रीडापटूंच्या भत्त्यांमध्येही कपात करण्यात आली असून १११ कोटींवरून हा आकडा ७० कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे.

*   राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसुद्धा ७७.१५ कोटींवरून ५० कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे.

*  भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) निधीमध्येही कपात केली असून, ६१५ कोटींवरून हा निधी ५०० कोटींपर्यंत कमी करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:56 am

Web Title: provision of rs 2827 92 crore for the sports sector in the budget abn 97
टॅग : Budget 2020
Next Stories
1 जोकोव्हिचच्या बालेकिल्ल्याला थीम खिंडार पाडणार?
2 Australian Open : सोफिया केनिनने पटकावलं विजेतेपद
3 Union Budget 2020 : क्रीडा खात्याच्या पदरी निराशा, अनेक महत्वाच्या संस्थाच्या निधीत कपात
Just Now!
X