न्यूझीलंड दौऱयामधील दोन्ही कसोटी सामन्यांत भारताची निराशाजनक कामगिरी असूनही भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे संघाने चांगली कामगिरी केल्याचे म्हणणे आहे.
न्यूझीलंड दौऱयातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा ०-४ आणि कसोटी मालिकेत ०-१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तरीसुद्धा कर्णधार धोनी म्हणतो की, सार्वत्रिक कामगिरी बघता संघाची कामगिरी चांगली झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱयानंतर आमची कामगिरी सुधारत आहे. संघात उत्तम खेळाडू आहेत हे आम्ही दाखवून दिले आहे. विशेषत: कसोटी सामन्यांत संघाची कामगिरी चांगली झाली. येथील परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक खेळाडूने प्रतिकुल परिस्थितीमध्येही झुंज दिली. असेही धोनी म्हणाला. तसेच दुसऱया कसोटी सामन्यात गोलंदाजांनी योग्य कामगिरी केली परंतु, मॅक्क्युलमची फलंदाजी भेदक ठरत होती असे म्हणत धोनीने मॅक्क्युलमच्या त्रिशतकाचे कौतुकही केले आणि भारतीय गोलंदाजांची पाठराखणही केली.