News Flash

IND vs WI : विराट-रोहितमधली बहुचर्चित शर्यत अखेरीस बरोबरीत

अखेरच्या टी-२० सामन्यात भारताची बाजी

मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विंडीजवर ६७ धावांनी मात केली. या विजयासह भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी विंडीडच्या गोलंदाजांची पिसं काढत २४० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्याअखेरीस कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातली बहुचर्चित शर्यत अखेरीस बरोबरीत सुटली आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहितची विक्रमी अर्धशतकी खेळी, केली कोणालाही न जमलेली कामगिरी

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित आणि विराटमध्ये चढाओढ सुरु होती. काही सामन्यांनतर विराट तर काही सामन्यांनतर रोहित शर्मा या यादीत आघाडीवर असायचा. २०१९ वर्षातली भारतीय संघाची अखेरची टी-२० मालिका आता संपली आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यापर्यंत रोहित शर्मा या शर्यतीत पिछाडीवर पडला होता. मात्र घरच्या मैदानावर खेळताना रोहित शर्माने आक्रमक ७१ धावांची खेळी करत विराटला मागे टाकलं. मात्र विराट कोहलीनेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २९ चेंडूत नाबाद ७० धावा करत रोहितशी बरोबरी केली.

रोहित शर्माने घरच्या मैदानावर खेळताना ३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७१ धावा केल्या. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता वन-डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १५ तारखेला पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 9:40 am

Web Title: race for leading run scorer in t20i ends on equal note as virat level up with rohit sharma psd 91
Next Stories
1 पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका : पहिल्या दिवसावर पाकिस्तानचे वर्चस्व!
2 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिव्हरपूल, चेल्सी उपउपांत्यपूर्व फेरीत
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा संघ पराभवाच्या छायेत!
Just Now!
X