आयपीएल २०२१ मध्ये बुमराह, हरभजन आणि अश्विन तिनही खेळाडू वेगवेगळ्या संघातून खेळत आहेत. बुमराह (मुंबई इंडियन्स), आर अश्विन (दिल्ली) आणि हरभजन (कोलकाता) संघाकडून खेळत आहेत. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल मग हे राजस्थानच्या संघात कसे काय?. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. हे शक्य झालं श्रेयस गोपाळनं केलेल्या अॅक्शनमुळे. श्रेयसनं या तिघांच्या गोलंदाजीची हुबेहुब नक्कल केली. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघता बघता चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी श्रेयसच्या व्हिडिओला पसंती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थानचा फिरकीपटू श्रेयस गोपाळनं बुमराह, हरभजन आणि अश्विनच्या गोलंदाजीची नक्कल केली. सर्वात आधी गोपाळनं जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल केली. त्यानंतर आर. अश्विन आणि हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल केली. राजस्थाननं या प्रत्येक अॅक्शनचं नामकरणही केलं आहे. जसप्रीत गोपाळ, रविचंद्रन गोपाळ आणि हरभजन गोपाळ असं नाव दिलं आहे.

हा व्हिडिओ जसप्रीत बुमराहलाही दाखवल्याचं श्रेयस व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे. त्यावेळी बुमराहनं माझ्यापेक्षा चांगली नक्कल करतो असं सांगितलं, असं श्रेयस व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे.

IPL 2021: केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गनला दंड

श्रेयसला या आयपीएल स्पर्धेत पंजाबविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने ३ षटकात ४० धावा दिल्या आणि एकही गडी बाद करू शकला नाही. हा सामना राजस्थानच्या संघाला ४ धावांनी गमावावा लागला होता. त्यानंतर झालेल्या दिल्ली आणि चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली नव्हती. आता बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळते का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals shreyas gopal imitated jaspreet bumrah ashwin and harbhajan rmt
First published on: 22-04-2021 at 16:30 IST