News Flash

मिताली राजचे निवृत्तीचे संकेत

‘‘सध्याचा काळ आमच्यासाठी खडतर आहे, परंतु मी तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे.

क्रिकेटपटू मिताली राज

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करेन, असे भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राजने सांगितले.

‘‘आंतरराष्ट्रीय क्र्रिकेटमध्ये गेली २३ वर्षे खेळत आहे, परंतु २०२२ मध्ये कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळेन. न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्ट्यांसाठी वेगवान गोलंदाजीच्या पर्यायाचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत,’’ असे मिताली म्हणाली.

‘‘सध्याचा काळ आमच्यासाठी खडतर आहे, परंतु मी तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. फलंदाज  म्हणून प्रत्येक दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे,’’  असे मितालीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:02 am

Web Title: retire after next year world cup akp 94
Next Stories
1 दमदार दिल्लीची झुंजार हैदराबादशी गाठ
2 रक्तद्रव दानासाठी सचिनची हाक
3 RR vs KKR : राजस्थानचा कोलकातावर ‘हल्लाबोल’!
Just Now!
X