News Flash

रितू राणीला विश्रांती, दीपिकाकडे नेतृत्व

पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या हॉक बे चषक हॉकी स्पध्रेकरिता भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

| March 18, 2016 12:49 am

पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या हॉक बे चषक हॉकी स्पध्रेकरिता भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची कर्णधार रितू राणीला विश्रांती देण्यात आली असून या स्पध्रेत वरिष्ठ बचावपटू दीपिकाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
सुशिला चानू पुख्रबांम उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडेल. २ ते १० एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्यासमोर जागतिक क्रमवारीत वरचढ असलेल्या न्यूझीलंड, चीन आणि आर्यलड यांचे आव्हान असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 12:49 am

Web Title: ritu rani
Next Stories
1 आयपीएलमधूनही विजय मल्या बाहेर
2 BLOG : गेssल, गेssल, गेला… अर्थात गोssईंग, गोssईंग, गॉन!!
3 मी आफ्रिदीच्या मुलाची आई होणार आहे; भारतीय मॉडेलचा दावा
Just Now!
X