IND vs ENG : चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांच्या अडचणी वाढवल्या. जो रुटनं संयमी फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली. जो रुटचं हे पाचवं द्विशतक होतं. सपाट खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाज कसून फलंदाजी केली. भारताच्या प्रमुख खेळाडूंना इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकूश ठेवण्यात अपयश आलं होतं. विराट कोहलीनं सलामी फलंदाज रोहित शर्माला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं.

रोहित शर्मानं दोन षटकं गोलंदाजी केली. रोहित शर्मानं आपल्या दोन षटकांत ७ धावा दिल्या. मात्र, त्याच्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजीच्या शैलीची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. रोहित शर्मानं हरभजन सिंह याच्या गोलंदाजीची हुबेहूब नक्कल केली. रोहित शर्माची गोलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी भज्जीची आठवण झाल्याचं पाहायलं मिळालं.

पाहा व्हिडीओ –

रोहित शर्मानं हरभजन सिंहच्या गोलंदाजीची केलेल्या नक्कलची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी रोहित शर्माच्या गोलंदाजीचं कौतुक करत आहेत.