वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वन-डे सामना जिंकत टीम इंडियाने सरत्या वर्षाला विजयी निरोप दिला. टी-२० मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकाही भारताने २-१ च्या फरकाने जिंकली. भारताकडून रोहित शर्माने २०१९ हे वर्ष गाजवलं. विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेतही रोहितने मालिकावीराचा किताब मिळवला. मात्र २०२० साली पहिल्याच दौऱ्यात रोहित शर्मा विश्रांती घेणार असल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – IND vs WI : …आणि केवळ १० धावांनी रोहितचा अनोखा विक्रम हुकला

५ जानेवारीपासून श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येतोय. या दौऱ्यात भारत ३ टी-२० सामने खेळणार आहे. मात्र खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितला या मालिकेत विश्रांती दिली जाणार आहे. “निवड समिती सहसा टी-२० मालिकेत कोणाला विश्रांती देत नाही. मात्र रोहित गेले काही महिने सतत क्रिकेट खेळत आहे. त्याने बोर्डाला मला विश्रांती हवी असल्याचं कळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत तो पुनरागमन करेल”, BCCI मधील सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माचा डबल धमाका, कर्णधार विराटसह माजी प्रशिक्षकांनाही टाकलं मागे

विंडीजविरुद्धचा अखेरचा वन-डे सामना हा २०१९ वर्षातला भारतीय संघाचा अखेरचा सामना होता. यानंतर नवीन वर्षात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. २०२० वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. २०१९ वर्षाची अखेर भारतीय संघाने मालिका विजयाने केली आहे, त्यामुळे २०२० वर्षाची सुरुवात भारतीय संघ कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत