27 February 2021

News Flash

IND vs AUS : रोहित शर्मा बाहेर, सिडनी कसोटीत या तिघांपैकी एकाला मिळणार संधी

रोहित शर्माने सिडनी कसोटीतून माघार घेतली आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहीत शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रोहित लवकरच मुलगी आणि पत्नीला भेटण्यासाठी मायदेशी परतणार आहे. म्हणून रोहित शर्माने सिडनी कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटीत रोहितच्या जागी संघव्यवस्थापन कोणाला संधी देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, संघव्यवस्थापन चौथ्या कसोटीत दोन बदल करू शकतो. हनुमा विहारीकडेच रोहित शर्माचा पर्याय म्हणून जात आहे. त्यामुळे हनुमा विहारीला सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवून केएल राहुल, विजय किंवा पार्थिवला मयंकबरोबर सलामीला पाठवू शकते. त्याशिवाय रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संधी दिली जाऊ शकते. वन-डे सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये येणं गरजेच आहे. त्यामुळे हार्दिकला संधी दिली जाऊ शकते. तिसरा पर्याय अश्विन आहे. दुखापतीमुळे अश्विनला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. परंतु त्याला आता फिट घोषीत करण्यात आले आहे. तसेच सिडनी टेस्ट ही फिरकीला चांगली साथ देईल असे बोलले जात आहे. तसेच अश्विन रोहितची कमी बऱ्यापैकी भरूनही काढू शकतो.

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याच कसोटीत रोहितने 63 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला होता.सिडनी कसोटीत भारतीय संघ विजय मिळवून मालिका 3-1 अशी जिंकण्यासाठी उत्सूक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 11:18 pm

Web Title: rohit sharma will not be part of team indias playing xi for the 4th test against australia
Next Stories
1 फेडरर-सेरेनामध्ये झुंज रंगणार
2 कमिन्स, स्टार्क, हेझलवूडला एकदिवसीय मालिकेत विश्रांती
3 Video : कोहली आणि जाडेजा .. बघा कोण जिंकलं धावण्याची शर्यत
Just Now!
X