आयपीएलचा चौदावा हंगाम बीसीसीआयने स्थगित केल्यानंतर सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे हे खेळाडू संघातील आपल्या इतर सहकाऱ्यांना भेटून घरी जात आहेत. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आपला युवा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याला एक खास भेट दिली आहे. बटलरने यशस्वीला एक बॅट दिली आहे.

बटलरचा यशस्वीला खास संदेश

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Jammu Kashmir Gulmarg fire viral video
हॉटेलला लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिकांचा भन्नाट जुगाड! Video पाहून नेटकरी म्हणाले, “अरे रे…”
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा

या बॅटद्वारे बटलरने यशस्वीला एक खास संदेश दिला. ”तुझ्या गुणवत्तेचा आनंद घे, माझ्या तुला शुभेच्छा”, असे बटलरने या बॅटवर आपली स्वाक्षरी देत म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सने या दोघांचा बॅटसह फोटो आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.

 

करोना विषाणूमुळे आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यात आले आहे. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यांनाही करोनाची लागण झाली.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसनेही आयपीएल पुढे ढकलल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्हाला आयपीएल थांबवावे लागले हे अत्यंत निराशाजनक आहे, परंतु अशा गोष्टी घडल्या आहेत. याक्षणी बरेच लोक अनेक समस्यांशी झगडत आहेत आणि बहुधा ते करण्याचा योग्य निर्णय आहे. प्रत्येकाने करोनाला पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, कारण याक्षणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे”, असे मॉरिस म्हणाला.

ख्रिस मॉरिसच्या म्हणण्यानुसार, एकदा करोना विषाणूविरूद्ध युद्ध जिंकल्यास आयपीएल पुन्हा सुरू करता येईल.