05 April 2020

News Flash

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतसंदीप काळे विजेता

अंतिम लढतीत सांगलीच्या सतीश सूर्यवंशी याच्यावर २-० अशा गुणांनी मात केली.

 

सोलापूरच्या संदीप काळेने मुठा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम लढतीत सांगलीच्या सतीश सूर्यवंशी याच्यावर २-० अशा गुणांनी मात केली. त्याला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. साईनाथ रानवडे व राहुल खाणेकर यांच्यातील कुस्ती ४५ मिनिटांच्या खडखडीनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. तानाजी झुंजुरके याने तेजस वांजळे याच्यावर लपेट डाव टाकून निर्णायक विजय मिळवला.

अन्य निकाल-५७ किलो : १.स्वप्नील शेलार, २.अजिंक्य भिलारे. ६५ किलो : १.सूरज कोकाटे, २.बळीराम मारणे. ७० किलो : १.उत्कर्ष काळे, २.संदेश काकडे. ७४ किलो : १.अमित खोपडे, २.रवींद्र करे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2015 5:14 am

Web Title: sandeep kale win a state level wrestling competition
Next Stories
1 बॅडमिंटन : वैष्णवी भालेला जेतेपद
2 पाकिस्तानशी मालिका खेळण्यात गैर नाही
3 आर्सेनल अव्वल स्थानावर
Just Now!
X