पृथ्वी, मयांक, विहारी, पार्थिव यांची अर्धशतके; रहाणे, विजय मात्र अपयशी

माऊंट माँगमाय (न्यूझीलंड)

युवा फलंदाज पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, हनुमा विहारी व अनुभवी पार्थिव पटेल या चौघांच्या दमदार अर्धशतकांमुळे भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या दिवशी ५ बाद ३४० अशी मजल मारली असून, पार्थिव ७९ धावांवर नाबाद आहे.

नाणेफेक जिंकून कर्णधार रहाणेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी व मुरली विजय यांनी पहिल्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी रचत हा निर्णय सार्थ ठरवला. मात्र विजयचे यामध्ये अवघ्या २८ धावांचे योगदान होते. तो बाद झाल्यावर मयांकसह पृथ्वीने दुसऱ्या गडय़ासाठी ५० धावा जोडल्या. सहा चौकार व एका षटकारासह ६२ धावा काढून पृथ्वी बाद झाला.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ (पहिला डाव) : ८९.४ षटकांत ५ बाद ३४० (हनुमा विहारी ८६, पार्थिव पटेल खेळत आहे ७९, मयांक अगरवाल ६५, पृथ्वी शॉ ६२; ब्लेर टिकनर २/४८).