News Flash

निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत

सोशल मीडियावर आश्विनशी गप्पा मारताना सांगितला प्लान

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित केलं आहे. या काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही भारतीय खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारत क्रिकेटचा माहोल कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि फिरकीपटू रविचंद्रन आश्विन यांनी नुकत्याच इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारल्या. यात शिखर धवनने आपल्या निवृत्तीनंतरच्या योजनेबद्दल सांगितलं.

“माझी विनोदबुद्धी खूप चांगली आहे. ज्या दिवशी मी समालोचनाकडे वळेन, मला खात्री आहे की मी त्यात चांगली कामगिरी करेन. विशेषकरुन हिंदीमध्ये…लोकांना हसवणं हे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. मी हे काम सहज करु शकतो.” शिखरने आश्विनशी गप्पा मारताना आपला प्लान सांगितला.

लॉकडाउन काळात शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. आपली पत्नी, मुलं यांच्यासोबत डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सर्व क्रिकेट सामने बंद असल्यामुळे भारतीय खेळाडू पुन्हा कधी मैदानात उतरतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 6:02 pm

Web Title: shikhar dhawan explain on why he would make a good commentator psd 91
Next Stories
1 हरभजननंतर कैफची माजी प्रशिक्षक चॅपेल यांच्यावर टीका
2 KKR चा सुनिल नरीन म्हणतो, भारत माझ्यासाठी एका प्रकारे दुसरं घर…
3 शास्त्री गुरूजींना टीम इंडियाच्या शिलेदारांकडून विशेष शुभेच्छा
Just Now!
X