21 September 2020

News Flash

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

सिंधूची उपांत्य लढत चीनच्या बिगरमानांकित काय यानयानशी होणार आहे.

| April 26, 2019 03:10 am

पी. व्ही. सिंधू

वुहान (चीन) : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना गुरुवारी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने ३३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या चोयरून्निसाचा २१-१५, २१-१९ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली सिंधूची उपांत्य लढत चीनच्या बिगरमानांकित काय यानयानशी होणार आहे.

सातव्या मानांकित सायनाने ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम गा ईऊनचा २१-१३, २१-१३ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली सायना उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील अकानी यामागुचीशी भिडणार आहे.

पुरुष एकेरीत समीरने हाँगकाँगच्या लाँग अँगसचे आव्हान २१-१२, २१-१९ असे मोडीत काढले. पुढील फेरीत त्याच्यासमोर चीनच्या द्वितीय मानांकित शि युकीचे आव्हान असेल.

मिश्र दुहेरीत उत्कर्ष अरोरा आणि करिष्मा वाडकर यांचे दुसऱ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाच्या हाफिझ फैझल आणि ग्लोरिया ईमानुइल्ले विडजाजा जोडीने उत्कर्ष-करिष्माला २१-१०, २१-१५ असे नामोहरम केले. याचप्रमाणे चीनच्या वांग यिलयू आणि ह्युआंग डाँगपिंग जोडीने वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगण जोडीचा २१-१०, २१-९ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 3:10 am

Web Title: sindhu sameer saina seal quarterfinal spots at badminton asia championships
Next Stories
1 टंचाईग्रस्त रांजणीत प्रतिकुलतेला ‘खो’
2 जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : साथियानसह भारताचे आव्हान संपुष्टात
3 ‘टीम इंडिया’ला विश्वचषकाची आस
Just Now!
X