तात्पुरत्या निलंबनाची कारवाई

भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या टेबल टेनिस संघातून सौम्यजित घोषला वगळण्यात आले आहे. एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी घोषची कोलकातामध्ये पोलीस तक्रार झाल्यामुळे त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस चौकशी आणि न्यायालयाचा निकाल यायचा असल्यामुळे भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या कार्यकारी मंडळाने घोषवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनामुळे त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशा कोणत्याही स्पर्धेत त्याला सहभागी होता येणार नाही, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली. गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी २४ वर्षीय अर्जुन पुरस्कार विजेत्या घोषचा जर्मनीमध्ये सराव सुरू होता. मात्र नातेसंबंध संपुष्टात आल्यानंतर ती तरुणी माझी कारकीर्द संपवण्यासाठी हे आरोप करीत आहे, असा दावा घोषने केला होता.