04 August 2020

News Flash

विजेंदरला क्रीडा मंत्रालयाचा ठोसा, उत्तेजक चाचणीस सामोरे जावे लागणार

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग हा अमली पदार्थ सेवनाबाबत आणखी संकटात सापडला जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीस (नाडा) त्याची उत्तेजक चाचणी घेण्यास

| April 2, 2013 03:04 am

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग हा अमली पदार्थ सेवनाबाबत आणखी संकटात सापडला जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीस (नाडा) त्याची उत्तेजक चाचणी घेण्यास सांगितले आहे. विजेंदर याने डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत बारा वेळा हेरॉईन घेतले असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. विजेंदर याच्यावर अमली पदार्थाच्या व्यापारात अडकला असल्याचा आरोप ठेवल्यानंतर एक महिन्याने क्रीडा मंत्रालयास जाग आली आहे. मंत्रालयाने नाडाचे सरसंचालक मुकुल चटर्जी यांना पत्र लिहून विजेंदरची वैद्यकीय चाचणी घेण्याचे कळविले आहे. विजेंदर हा अशा बेकायदेशीर व्यापारात अडकला असल्याचे पाहून मंत्रालयास अतिशय खेद वाटत आहे. विजेंदर हा उदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श खेळाडू मानला जातो. त्यामुळेच त्याच्यावरील आरोपांची शहानिशा करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊनच त्याची उत्तेजक चाचणी घेण्याची आवश्यकता आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2013 3:04 am

Web Title: sports ministry bash vijender singh have to give excitant test
Next Stories
1 अमरावती, पुणे, नागपूर अजिंक्य
2 मायकल क्लार्कला जठरांचा विकार
3 विजेंदरने वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे -संधू
Just Now!
X