अंतिम रेषेजवळ पोहोचणाऱ्या संघांसाठी टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीच्या संयोजकांनी कठोर नियम आखले आहेत. एका आठवडय़ात सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संघातील दोन किं वा त्यापेक्षा अधिक सदस्यांना करोनाची लागण झाल्यास, त्या संघांना शर्यतीतून बाहेर काढण्यात येईल.

तीन आठवडे रंगणाऱ्या या शर्यतीला सुरुवात होण्याच्या काही तासआधी संयोजकांनी शनिवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे सादर केली. शर्यतीदरम्यान सायकलस्वाराला करोनाची बाधा झाल्यास, पुढील टप्प्याआधी त्याची करोना चाचणी करण्यात यावी. निरोगी सायकलस्वाराला शर्यतीतून माघार घ्यावी लागू नये, यासाठी चुकीच्या चाचण्या टाळण्यात याव्यात, असेही त्यात म्हटले आहे. करोनाची चाचणी के ली नाही म्हणून बेल्जियममधील लोट्टो-सौडाल या संघातील चार सहाय्यक कर्मचाऱ्यांना मायदेशी पाठवण्यात आले होते.