T20 World Cup 2020 : महिला टी २० विश्वचषक २०२० मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड असे ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचले. अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीच्या आधीच यजमान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुरुवारी ५ मार्चला उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. त्या आधी ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू अष्टपैलू एलिस पेरी हिला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.

नक्की पाहा – एलिस पेरीचे ‘सुपरहॉट’ फोटो

न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात पेरीला दुखापत झाली. न्यूझीलंडच्या एका फलंदाजाला धावबाद करण्याच्या प्रयत्नात तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिला सामन्यातून बाहेर जावे लागले. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाद्वारे पेरी उर्वरित सामन्यात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले.

Video : … अन् सुरेश रैनाने थेट मारली धोनीला मिठी

ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक

फिरकीपटू जॉर्जिआ वेरहॅमने (३/१७) केलेल्या अप्रतिम गोलंदाजीला सलामीवीर बेथ मूनीच्या (६०) अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने सोमवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर चार धावांनी सरशी साधली. या विजयासह ऑस्ट्रेलिया ‘अ’ गटातून उपांत्य फेरी गाठणारा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला.

कौतुकास्पद! टीम इंडियाची जर्सी देऊन श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा सन्मान

प्रथम फलंदाजी करताना मूनीव्यतिरिक्त कर्णधार मेग लॅनिंग (२१) आणि एलिस पेरी (२१) यांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. मूनीने ५० चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ६० धावा केल्या.

Video : धोनीला तोड नाही… त्याचा ‘हा’ भन्नाट स्टंट एकदा बघाच

प्रत्युत्तरात फिरकीपटू वेरहॅमने अवघ्या १७ धावांत कर्णधार सोफी डिव्हाइन (३१), सूझी बेट्स (१४) आणि मॅडी ग्रीन (२८) या तिघींचे बळी मिळवून ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात २० धावांची आवश्यकता असताना न्यूझीलंडला १५ धावाच करता आल्याने त्यांना एकूण ७ बाद १५१ धावांवर समाधान मानावे लागले.