News Flash

Video : भारतीय चाहत्यांसाठी ‘टीम इंडिया’ने दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

सामान्यतः संघातील महत्वाचे खेळाडू किंवा देशातील प्रसिद्ध व्यक्ती यांचा व्हिडिओत समावेश असतो. पण या व्हिडिओत विविध सामन्यात हजर असलेले भारतीय चाहते समाविष्ट करण्यात आले आहेत.

भारताचा आज स्वातंत्र्यदिन. भारतीय क्रिकेट संघ सध्या भारतात नाही. सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ कसोटी मालिका खेळत असून तेथे पाच सामन्यांच्या मालीकेत भारत २-०ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता भारताला पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. किंवा २ सामने जिंकून १ सामना अनिर्णित राखणे कर्मप्राप्त आहे. लॉर्ड्स वर झालेल्या सामन्यात भारताला अत्यन्त लाजिरवाणा पराभव लागला. त्यामुळे कर्णधार कोहलीवर चाहत्यांनी सडकून टीका केली. त्यामुळे कोहलीने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. आमची साथ सोडू नका, असे भावनिक आवाहन त्याने काल चाहत्यांना उद्देशून केले.

दरम्यान, आज टीम इंडियाने भारतीय चाहत्यांसाठी एक विशेष व्हिडीओ तयार केला आहे. सामान्यतः संघातील महत्वाचे खेळाडू किंवा देशातील प्रसिद्ध व्यक्ती यांचा व्हिडिओत समावेश असतो. पण या व्हिडिओत विविध सामन्यात हजर असलेले भारतीय चाहते समाविष्ट करण्यात आले आहेत. या व्हिडिओद्वारे चाहत्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

On behalf of the BCCI & Indian Cricket Team, wishing all Indians a very #HappyIndependenceDay

A post shared by Team India (@indiancricketteam) on

 

‘टीम इंडिया’च्या वेरिफाइड इंस्टाग्राम अकाउंटवरून ही व्हिडीओ पोस्ट करण्यात आली असून यात विविध चाहत्यांचे व्हिडीओ एकत्र करण्यात आले आहेत. या व्हिडिओला सुमारे २ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. BCCI आणि भारतीय संघाच्या वतीने साऱ्यांना या व्हिडिओतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:01 pm

Web Title: team india wishing indian fans on independence day on instagram account
Next Stories
1 Asian Games 2018 Blog : टेनिसपटूंकडून भारताला पदकाच्या किती आशा?
2 ‘नशा ये हिन्दुस्तां के सम्मान का है।’, खास फोटो ट्विट करत सेहवागने दिल्या शुभेच्छा
3 Independence Day 2018 : सचिनने भारतीयांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या शुभेच्छा, म्हणाला…
Just Now!
X