News Flash

रविंद्र जाडेजा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं प्रशस्तीपत्रक

सराव सामन्यात जाडेजाची आश्वासक खेळी

विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. स्पर्धेआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताची कामगिरी फारशी आश्वासक राहिलेली नाहीये. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताला पराभव तर बांगलादेशविरुद्ध सामन्यात भारताने विजय संपादन केला. मात्र अनेक माजी खेळाडूंच्या मते भारतीय संघ या स्पर्धेच्या विजेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकल क्लार्कने, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाचं कौतुक केलं आहे.

सध्याच्या घडीला विश्वचषक स्पर्धेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविंद्र जाडेजा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचं मायकल क्लार्कने म्हटलं आहे. “माझ्या मते रविंद्र जाडेजापेक्षा उत्तम क्षेत्ररक्षक या स्पर्धेत तुम्हाला सापडणार नाही. मैदानावर धावा वाचवणं असो, महत्वाची जोडी फोडणं असो, कठीण झेलं घेणं, थेट चेंडू फेकत धावबाद करणं असो या सर्व गोष्टींमध्ये जाडेजा मातब्बर आहे.” समालोचन करत असताना क्लार्कने जाडेजाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – विराट कोहली अप्रगल्भ, स्वतःवर टीका केलेली सहन होत नाही !

न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात रविंद्र जाडेजाने अर्धशतकी खेळी करत गरजेच्या वेळी आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवलं होतं. त्यामुळे पहिल्या सामन्यात जाडेजाला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – सरावातून वेळ काढत टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 5:40 pm

Web Title: there is no one better than him in world cricket says michael clarke hails ravindra jadejas fielding ability
टॅग : Ravindra Jadeja
Next Stories
1 विराट कोहली अप्रगल्भ, स्वतःवर टीका केलेली सहन होत नाही !
2 सरावातून वेळ काढत टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो
3 ICC World Cup 2019 : विश्वविजेत्यांना आव्हान
Just Now!
X