भारताचा चायनामन फिरकीपटू म्हणून ओळख मिळवलेल्या कुलदीप यादवने अल्पावधीत भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. कुलदीप यादव-युजवेंद्र चहल जोडीने वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये प्रमुख फिरकीपटूंची जागा आपल्या नावे केली आहे. कुलदीपने यापुढे जाऊन कसोटीमध्येही आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. आपल्या वेगळ्या शैलीने कुलदीपने आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाजांना जाळ्यात अडकवलं आहे. एका मुलाखतीत त्याला या शैलीबद्दल विचारलं असता, माझी शैली कोणत्याही प्रकारे वेगळी नाहीये; हा सगळा मूर्खपणा आहे असं उत्तर कुलदीपने दिलं.

ज्या पद्धतीने रविचंद्रन आश्विन गोलंदाजी करतो, त्याच पद्धतीने मी गोलंदाजी करतो. फक्त मी मनगटातून चेंडू वळवतो हाच आमच्यातला फरक आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी कुलदीप यादवचं संघातलं स्थान निश्चीत मानलं जात आहे. आतापर्यंत 39 वन-डे सामन्यात कुलदीपच्या नावावर 77 बळी जमा आहेत.

अवश्य वाचा – अबब ! एकाच डावात 23 षटकार, विंडीजच्या फलंदाजांची विक्रमी खेळी