वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत काल रविवार श्रीलंका व यजमान वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामन्याचा नाणेफेक जिंकलेल्या वेस्टइंडिज संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांची सुरूवात निराशाजनक झाली १९ षटकांच्या अखेरीस ३ बाद ६० अशी धावसंख्या झाली होती आणि पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सामना मध्येच थांबविण्यात आला व त्यांतरचा खेळ होऊ शकला नाही. आता आज सोमवार थांबविण्यात आलेला सामना खेळविण्यात येणार आहे.
पोर्ट ऑफ स्पेन येथील स्थानीक वेळेनुसार दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास पाऊस थांबला होता. परंतु, मैदान खेळण्यालायक करण्यासाठी जवळपास दोन तासांचा अवधी लागणार असल्यामुळे पंचांनी उर्वरित सामना आज सोमवारी खेळविण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज श्रीलंका ३ बाद ६० धावसंख्येपासून पुढील खेळी करण्यास सुरूवात करणार आहे.