News Flash

Video : टप्प्यात आला अन् डी-कॉकनं १९३ वरच पाकिस्तानी फलंदाजाचा कार्यक्रम केला

हे योग्य की अयोग्य असा वाद आता सुरु झालाय

पाकिस्तान विरुद्द दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये पाकिस्तानचा सलामीवर फखर जमां याने १५५ चेंडूंमध्ये १९३ धावांची दमदार खेळी केली. मात्र या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर १७ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. द. आफ्रिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात ३४१ धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानच्या संघाला केवळ ३२४ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानच्या खेळीमध्ये फखर जमांचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकलं. मात्र ज्यापद्धतीने फखर जमां बाद झाला त्यावरुन चांगलाच वाद सुरु झालाय.

शेवटच्या षटकामध्ये पाकिस्तानला विजयासाठी ३० हून अधिक धावा हव्या होत्या. या षटकामध्ये फखरने पहिलाच चेंडू सीमारेषेपर्यंत मारला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरी धाव घेताना फखरचं लक्ष क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडे नव्हतं. याचा फायदा द. आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने घेतला. क्विंटन डी-कॉकने क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने चेंडू नॉन स्ट्राइकर एण्डला फेकल्याचा इशारा केला. हात वर करुन डी-कॉकने चेंडू तिकडे फेक असं म्हटलं. त्यामुळे फखरने मागे वळून पाहिलं. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्याने चेंडू थेट फखर धावत होता त्या दिशेने फेकत यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. फखर १९३ धावांवर बाद झाला. संघाला जिंकवता आलं नसतं तरी फखरचा उरलेल्या चेंडूंमध्ये द्विशतक नक्कीच पूर्ण करता आलं असतं, असं पाकिस्तानी चाहत्यांचं म्हणणं आहे. डी-कॉकचं हे वागणं फेक फिल्डींगअंतर्गत येत असून द. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला सुद्धा शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पाकिस्तानी चाहते करत आहेत.

पाकिस्तानच्या काही आजी माजी खेळाडूंनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केलीय.

काही व्हायरल ट्विट पाहुयात…

१)

२)

३)

४)

५)

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रम फखरने स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसनच्या नावे होते. २०११ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना वॉटसनने १८५ धावा केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 11:03 am

Web Title: twitter reactions fans divided after quinton de kock controversial gesture results in fakhar zaman run out scsg 91
Next Stories
1 मागील 50 वर्षात जे कोणाला जमले नाही, ते पाकिस्तानी फलंदाजाने करून दाखवले
2 IPL 2021 : मोईन अलीने खेळण्यास नकार दिल्यामुळे धोनीच्या चेन्नईने ‘तो’ लोगो हटवला? CSK ने दिलं स्पष्टीकरण
3 ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरवर भारताची भिस्त
Just Now!
X