News Flash

वानखेडेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना करोना

मुंबईतील सामन्यांवर करोनाचे सावट

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणाऱ्या आणखी दोन कर्मचाऱ्यांसह नळदुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे. राज्य शासनाने वानखेडेवर सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी दिली असून मंगळवारपासून रात्री आठ वाजल्यानंतर खेळाडूंना सराव करता येईल, असेही मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) नुकताच जाहीर केले. काही दिवसांपूर्वीच वानखेडेवरील १० कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचे वृत्त पसरले होते. परंतु त्यातील अनेकांच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. मात्र आता पुन्हा कर्मचाऱ्यांना करोना झाल्याने मुंबईतील सामन्यांवर करोनाचे सावट निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:14 am

Web Title: two more corona positive wankhede stadium abn 97
Next Stories
1 स्टोक्स-बटलर सलामीला; सॅमसन तिसऱ्या स्थानावर?
2 वेध आयपीएलचे : एका तपानंतर विजयी हल्लाबोल?
3 ‘क्रिकेट सुधार समिती’ कायम ठेवा!
Just Now!
X