भारताचा माजी फलंदाज वेणुगोपाल रावने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. १६ एकदिवसीय आणि ६५ ‘आयपीएल’ सामन्यांचा अनुभव असणाऱ्या रावने रणजीमध्ये आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले आहे. ३७ वर्षीय राव २३ मे, २००६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून ‘आयपीएल’मध्ये २००८ ते २०१४च्या काळात त्याने डेक्कन चार्जर्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.