वसिम जाफर (६८) आणि गणेश सतीश (नाबाद ८१) यांच्या अर्धशतकांच्या बळावर विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत कर्नाटकला २ बाद १७२ असे चोख प्रत्युत्तर दिले. त्याआधी रविकुमार ठाकूरच्या लाजवाब गोलंदाजीच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचा पहिला डाव फक्त ३५० धावांत रोखण्याची किमया साधली.
विदर्भाने गुरुवारच्या ६ बाद २९८ धावसंख्येवरून आपल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु ५२ धावांची भर घालत त्यांचे उर्वरित चार फलंदाज तंबूत परतले. आर. विनय कुमारने २२ धावा केल्या, तर विदर्भाच्या ठाकूरने ५० धावांत ४ बळी घेतले.
त्यानंतर विदर्भाची सुरुवात खराब झाली. फैझ फझल फक्त एक धावा काढून माघारी परतला. परंतु विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जाफरला अखेर सूर गवसला. त्याने गणेश सतीशच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सुचितने जाफरला बाद केले. जाफरने १० चौकारांसह १२० चेंडूंत ६८ धावा केल्या. मग सतीशने एस. बद्रीनाथ (खेळत २१) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांचीीाागीदारी केली. खेळ थांबला, तेव्हा सतीश २२६ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८१ धावांवर खेळत होता. अभिमन्यू मिथुन आणि सुचित यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) : १०२.४ षटकांत सर्व बाद ३५० (मनीष पांडे १०४, रॉबिन उथप्पा ५९, करुण नायर ५८; रविकुमार ठाकूर ४/५०, स्वप्निल बंडिवार २/७४) विदर्भ (पहिला डाव) : ७२ षटकांत २ बाद १७२ (गणेश सतीश खेळत आहे ८१, वसिम जाफर ६८; जगदीशा सुचित १/२७)