भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर आजपासून दोन संघामध्ये तिसरा सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. पण सलामीवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पहिल्याच दिवसाच्या खेळात भारताचा फिरकीपटू आर अश्विन याच्या रागाचा सामना यष्टीरक्षक ऋषभ पंतला करावा लागला.

Video: झेल टिपण्यासाठी ऋषभ पंतने घेतली हवेत उडी अन्…

विल पुकोव्हस्की संयमी फलंदाजी करत होता. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांची गोलंदाजी पुकोव्हस्की शांतपणे खेळत होता. त्यामुळे या दोघांना विश्रांती देण्याच्या उद्देशाने आणि विकेट मिळवण्याच्या उद्देशाने कर्णधार अजिंक्य रहाणेने अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं. अपेक्षेप्रमाणे अश्विनची गोलंदाजी पुकोव्हस्कीला फारशी कळत नव्हती. एका चेंडूवर पुकोव्हस्कीच्या बॅटची कड लागून चेंडू ऋषभ पंतकडे गेला. झेल दिसायला नक्कीच सोपा होता. पण ऋषभ पंतने मात्र झेल सोडला. बऱ्याच काळाने भारतीय संघाला विकेट मिळणार होती, पण पंतमुळे ती संधी गमवावी लागली. त्यामुळे अश्विनने भर मैदानातच पंतवर आपला राग व्यक्त केला.

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा- “बेटा, तुमसे ना…..”; ऋषभ पंतच्या खराब कामगिरीनंतर भन्नाट मीम्स व्हायरल

हा झेल सोडल्यानंतर पुकोव्हस्कीने संधीचं सोनं केलं. त्याने १०० चेंडूत ४ चौकारांसह आपलं अर्धशतक झळकावलं. त्याआधी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने दिवसाचा बराच वेळ वाया गेला. डेव्हिड वॉर्नर अवघ्या ५ धावांवर माघारी परतला.