भारतीय कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. गुरूवारपासून सुरू झालेल्या सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सामना सुरू होण्याआधी विराटला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त सहा धावांची गरज होती.

विराट कोहलीला कसोटीमध्ये सहा हजार धावा करण्यासाठी फक्त सहा धावांची होती. कोहलीने आतापर्यंत ११९ डावांत ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला. सचिनने १२० डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. त्यामुळे धावा काढण्याच्या बाबतीत विराट सचिनच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आज विराट कोहलीने चौथ्या कसोटीत सहा धावा काढत सचिनचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट सचिनचा हा विक्रम मोडेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना होताच.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने सहा डावांत ४४० धावांचा डोंगर उभा केला आहे. या मालिकेत विराट विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने ६९ कसोटी सामन्यातील ११८ डावांत फलंदाजी करताना २३ शतकांसह ५९९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी ५५ आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीची २४८ धावांची सर्वोत्तम खेळी आहे.