भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. २४ जानेवारीपासून भारत न्यूझीलंडविरूद्ध टी २० क्रिकेट मालिका खेळणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेसाठी दोनही संघ कसून सराव करत आहेत. या मालिकेच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच त्याने काही सूचक विधाने केली. त्यातील एक विधान हे यष्टीरक्षक ऋषभ पंत याला धडकी भरवणारे होते.

IPL 2020 : चाहत्याने KKR बद्दल विचारला प्रश्न; शाहरूखने दिलं मजेदार उत्तर

काय होतं ते वक्तव्य?

ऑकलंडमध्ये पहिला सामना होण्याआधी विराटने पत्रकारांशी संवाद साधला. “राहुलने यष्टीरक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. राहुलच्या या कामगिरीमुळे आम्हाला नवा पर्याय मिळाला. आता आम्हाला अतिरिक्त फलंदाज खेळवून अधिक समतोल संघ खेळवण्याची संधी मिळू शकते. जर तो यष्टीरक्षक म्हणून अशीच चांगली कामगिरी करत राहिला, तर त्याला यष्टीरक्षणाची जबाबदारी का द्यायची नाही? काही काळ राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी द्यायला काहीच हरकत नाही”, असे सांगत विराटने अप्रत्यक्षपणे ऋषभच्या जागी भारताला उत्तम पर्याय सापडल्याचे संकेत दिले. बाकीच्या खेळाडूंचे काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण आमच्यासाठी संघातील समतोल महत्त्वाचा आहे, असेही तो म्हणाला.

पुरूषांच्या क्रिकेट सामन्यांतून नफा, मग… – स्मृती मंधाना

शिखरच्या दुखापतीवर विराट म्हणतो….

“शिखर धवनच्या दुखापतीमुळे आमच्या काही योजनांना आळा घालावा लागणार आहे. आता आम्हाला एकदिवसीय सामन्यात तेच करावे लागेल, जे आम्ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध राजकोटला (दुसऱ्या सामन्यात) केलं होतं. संघात एखादा अतिरिक्त खेळाडू घेऊन राहुलला पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवावे असा आमचा विचार आहे. त्या क्रमांकावर राहुलदेखील खुलून खेळतो. टी २० क्रिकेटमध्ये काही गोष्टी बदलतात. आमच्या संघात तळाला फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला संघ अधिक आक्रमक किंवा समतोल करण्याची संधी आहे,” असे विराटने नमूद केले.