08 August 2020

News Flash

झिम्बाब्वे दौऱा: मुरली विजय ‘आऊट’; पुजारा, राहाणे, रसूल, शर्मा ‘इन’

दुखापतग्रस्त असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला झिम्बाब्वे दौऱयासाठी विश्रांती देण्यात आलीये.

| July 5, 2013 04:57 am

दुखापतग्रस्त असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला झिम्बाब्वे दौऱयासाठी विश्रांती देण्यात आलीये. त्याच्याऐवजी विराट कोहली यांच्याकडे संघाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱयासाठी टीम इंडियाच्या संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. 
मुरली विजय याला संघातून वगळण्यात आले आहे. गोलंदाज आर. अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि भुनवेश्वरकुमार यांना या दौऱयासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी परवेझ रसूल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, मोहित शर्मा, जयदेव उनाडकट यांचा १५ जणांच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
येत्या २४ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱयावर जाणार आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायडू, अजिंक्य राहाणे, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, मोहम्मद सामी, आर. विनयकुमार, मोहित शर्मा, जयदेव उनाडकट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2013 4:57 am

Web Title: virat kohli to lead team after selectors decided to rest m s dhoni
Next Stories
1 सुधा सिंगच्या कामगिरीबाबत उत्सुकता
2 ताजिकिस्तानच्या अ‍ॅलेक्झांडरकडे दोन हजार हिंदी गीतांचा संग्रह
3 चीनचे बिंगतियान व योंगली ठरले वेगवान धावपटू
Just Now!
X