01 March 2021

News Flash

रैनाची फलंदाजी पाहताना सेहवागला होते ‘या’ गाण्याची आठवण

सेहवागने केले एक मजेशीर ट्विट

सुरेश रैना

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या कारकिर्दीत स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून त्याची ख्याती होती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज यासारख्या संघाच्या वेगवान गोलंदाजांना त्याने चोपून काढले होते. निवृत्तीनंतर त्याच्या फलंदाजीला काहीसा विराम मिळाला, पण त्याची शाब्दिक फटकेबाजी अजूनही सुरु असते. सेहवाग आपल्या कल्पक ट्विटच्या माध्यमातून कायम चर्चेत असतो.

सेहवागने आजदेखील असेच एक मजेशीर ट्विट केले आहे. सुरेश रैना याची फलंदाजी जेव्हा सुरु असते, तेव्हा त्याच्या फटकेबाजीकडे पाहून सेहवागला ‘रैना बिती जाए, शाम न आए’ हे गाणं आठवतं असं त्याने म्हटलं आहे. याबरोरबच रैनाचा वाद्य वाजवतानाचा फोटो ट्विट करत त्याने रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही रैनाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चेन्नई सुपर किंग्ज संघानेही त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:33 pm

Web Title: virender sehwag and others wish suresh raina happy birthday with special tweet
Next Stories
1 ४ वर्षांपूर्वी आजच उजाडला होता क्रिकेट इतिहासातील काळा दिवस
2 मिताली, हरमनप्रीत यांची जोहरी, करीम यांना भेट
3 विराटला साथ द्या!
Just Now!
X