अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने दुबई येथे झालेल्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर दणदणीत विजय मिळवला. मात्र त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. आनंदने लौकिकाला साजेसा खेळ करत कार्लसनवर विजय मिळवला मात्र कार्लसनने सुवर्णपदकावर कब्जा केला. १०.५ गुणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले.