भारताच्या विश्वनाथन आनंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याने सातव्या फेरीत अझरबैजानच्या तैमूर रादजाबोव्हवर शानदार विजय संपादन केला. त्याचे आता चार गुण झाले आहेत.
रशियाच्या सर्जी कर्जाकिन याने साडेपाच गुणांसह आघाडी कायम राखली आहे. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नुस कर्जाकिन हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे पाच गुण आहेत. आनंद याने अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन याच्या साथीत संयुक्तरित्या तिसरे स्थान घेतले आहे. कार्लसन याने जॉन लुडविग हॅमर याच्यावर प्रेक्षणीय विजय मिळविला तर कर्जाकिन याने अमेरिकेच्या हिकारु नाकामुरा याला पराभूत केले. पीटर स्वेडलर (३.५ गुण) व व्हॅसेलीन तोपालोव्ह (३) यांच्यातील डाव बरोबरीत सुटला.
आनंद याने मिळविलेला विजय उल्लेखनीय ठरला. काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळतानाही त्याने रादजाबोव्ह याच्याविरुद्ध आकर्षक डावपेच केले. त्याने वजीराच्या बाजूच्या प्यादांचा
उपयोग करीत आपल्या प्रतिस्पध्र्यास निष्प्रभ केले.