जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने स्विंग गोलंदाजीचा अप्रतिम नमुना पेश करत सर्वांना चकित केले. ज्या फलंदाजाला आर्चरने बाद केले तोसुद्धा आर्चरची गोलंदाजी पाहून थक्क झाला. दुखापतीनंतर काऊंटी क्रिकेटमधून मैदानात परतलेल्या आर्चरला आयपीएलच्या १४व्या हंगामात भाग घेता आला नाही.

ससेक्स आणि सरे यांच्यातील सेकंड इलेव्हन चॅम्पियनशिपच्या सामन्यात आर्चरने शानदार गोलंदाजी केली. त्याची स्विंग गोलंदाजी पाहण्यासारखी होती. त्याने सरेचा मधल्या फळीतील फलंदाज रिफरला त्याच्या बनाना स्विंग गोलंदाजीने बाद केले. आर्चरने टाकलेला हा फलंदाजाला कळला नाही. त्याच्या या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात त्याने फलंदाजीतही योगदान दिले. त्याने ४६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावा केल्या.

 

सरे विरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या डावात आर्चर दुसर्‍या डावात गोलंदाजी करू शकला नाही. तो मैदानातही उतरला नाही. आर्चरच्या तंदुरुस्तीच्या बाबतीत ससेक्स संघाचे वैद्यकिय पथक चिंतेत आहे. उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे आर्चर इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या मोसमात खेळला नव्हता. आर्चरने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध टी-२० मालिकेत खेळला होता. एकदिवसीय मालिकेत तो संघाचा भाग नव्हता.

Banana स्विंग म्हणजे काय?

Banana स्विंग हा रिव्हर्स स्विंगचा एक प्रकार आहे. या स्विंगसाठी सामान्यपेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकण्याची आवश्यकता असते. या स्विंगमध्ये केळीच्या आकारासारखा चेंडू हवेत वळतो. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटला की तो ‘C’ आकारात वळतो.