विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्रसिंह धोनीने दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विंडीज दौऱ्यात ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आलं. मात्र धोनीचं वाढत वय आणि त्याच्यावर निवृत्तीसाठीचा दबाव पाहता, बीसीसीआयने आगामी स्पर्धांमध्ये ऋषभ पंत भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असं जाहीर केलं आहे. सध्या सुरु असलेल्या विंडीज दौऱ्यात ऋषभ पंत संघातली आपली जागा पक्की करण्यासाठी जिवापाड मेहनत घेतो आहे. दुसऱ्या सामन्याआधी ऋषभ पंतने कुलदीप यादवसोबत चक्क हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये सराव केला. कुलदीपचे फिरकी चेंडू पकडण्याचा सराव करत असतानाचा व्हिडीओ ऋषभ पंतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी झालेल्या टी-२० मालिकेत पहिल्या दोन सामन्यात ऋषभला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मात्र अखेरच्या सामन्यात ऋषभने नाबाद ६५ धावांची खेळी केली. भारतीय यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली त्याची ही खेळी सर्वोत्तम ठरली. पंतने महेंद्रसिंह धोनीचा ५६ धावांचा विक्रम मोडला.

अवश्य वाचा – Ind vs WI : दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट? जाणून घ्या काय आहे हवामानाचा अंदाज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch hotel corridor turns into 22 yard strip for rishabh pant and kuldeep yadav psd
First published on: 11-08-2019 at 15:39 IST